आईच्या वर्षश्राद्धा निमित्त धार्मिक विधी न करता जि. प. शाळेतील मुलांना केले अन्नदान

करमाळा (दि.२८) – भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगाला आदर्श मानत कोर्टी येथील निवृत्त शिक्षिका सौ.महानंदा चव्हाण यांनी आईच्या वर्षश्राद्ध निमित्त आपले हे धार्मिक विधी व कर्मकांड न करता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना जाऊन अन्नदान व मिठाईवाटप केले.
या उपक्रमाविषयी बोलताना सौ.महानंदा चव्हाण म्हणाल्या की, आई वडील हे देवाची कृपे आहेत. हे जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांना त्यांना सुख द्या त्यांना खायला प्यायला घाला. आई वडील गेल्यानंतर कर्मकांड करण्यात कोणताही अर्थ नाही. गोडधोड नैवेद्य केला आणि तो फोटोला दाखवला तो आई-वडिलांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे या परंपरेला फाटा देत मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मा. शहाणे सर आणि त्यांच्या सहकार्यांशी चर्चा करून विद्यालयातील मुलांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला.
सौ चव्हाण या व्याख्याते प्रा.राहुलकुमार चव्हाण यांच्या मातोश्री राजुरी येथील राजेश्वर विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत







