मोहरम व आषाढी एकादशी निमित्त करमाळा पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न - Saptahik Sandesh

मोहरम व आषाढी एकादशी निमित्त करमाळा पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – काल (दि. ८ जुलै) रोजी करमाळा पोलीस स्टेशन येथे आगामी मोहरम व आषाढी एकादशी निमित्त करमाळा तालुका पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. यामध्ये करमाळा शहरातील हिंदू-मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी विनोद घुगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी मोहरम व आषाढी एकादशी निमित्त सर्व समाजातील नागरिकांनी शांतता मय वातावरणात मोहरमचा सण साजरा करावा कायद्याचे पालन करावे, वेळेचे बंधन पाळावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. मोहरमच्या काळातच करमाळा शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी जाणाऱ्या विविध दिड्यांचे आगमन होवून पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत अशा वेळी एकाच वेळेस पोलीस प्रशासनावर ताण वाढणार आहे यावेळी आपण सर्वांनी सहकार्य करुन दोन्ही उत्सव शांततेत साजरे करावे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.

यावेळी सकल मुस्लीम समाजाचे शहर अध्यक्ष व जामा मस्जिद चे विश्वस्त अध्यक्ष जमीर भाई सय्यद यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत मुस्लीम समाजा तर्फे शिवजयंती, गणेश विसर्जन मिरवणुकीत समाजातर्फे जामा मस्जिद येथे येणाऱ्या मिरवणुकीचे स्वागत मोठ्या आनंदाने स्वागत केले जाते तसेच करमाळा शहरात येणाऱ्या दिंडी ची स्वागत मुस्लीम समाज तर्फे करण्यात येणार आहे.

यावेळी मुस्लीम समाजाचे जेष्ठ नेते फारुख भाई जमादार, आझाद भाई शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, जेष्ठ पत्रकार लोकमतचे नासीर भाई कबीर, पुण्य नगरी चे अलीम भाई शेख, पुढारी चे आशपक भाई सय्यद, नाल साहेब सवारी चे मुजावर अलीम भाई खान, सामाजिक कार्यकर्ते आयुब भाई शेख , युवक नेते दिशान भाई कबीर, मुख्तार पठाण, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!