नवरात्रनवमी निमित्त ऊत्तरेश्वर देवस्थानची अर्धनारी नटेश्वर रूपात महापुजा संपन्न

केम(संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ची पुजा शारदीय नवरात्र नवमी निमित्त अर्धनारी नटेश्वर रूपा त करण्यात आली.
या मंदिरात विविध सणानिमित्त त्या धर्तीवर येथील शिवलिंगाला सजावट करून पुजा केली जाते हि सजावट बाळासाहेब गुरव, सोमनाथ गुरव, मनोज मोकाशी, , शुभम कंदरकर अमोल गलांडे अजुंन पारखे, शुभम लांडगे यानी केली या सजावटी चे भाविकांनी कौतुक केले सोमवार व नवमी असल्याने भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती.

या सजावटी मधुन भाविकांचे मन प्रसन्न होते या मंदिरात वेगवेगळ्या सणानिमित्त त्या रूपात पुजा करण्याची प्रथा आहे याचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
– सागरराजे तळेकर, केम, युवा सेनेचे तालुका समन्वयक


