रामनवमीनिमित्त करमाळ्यात १४ ते १७ एप्रिल दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरात रामनवमी उत्सवांचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राम भक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.यंदा रामनवमी निमित्त शहरात 14 एप्रिल ते 17 एप्रिल 2024 या कालावधी मध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये भजन,किर्तन,व्याख्यान,महाआरती,शोभा यात्रा आदि विविध उपक्रम होणार असल्याची माहिती श्रीरामनवमी उत्सव समिती वतीने देण्यात आली.
यंदा अयोध्येत साकारलेल्या भव्य राम मंदिर मुळे या वर्षी होणाऱ्या रामनवमी साठी सर्व राम भक्तांमध्ये उल्हासाचे वातावरण आहे. शहरातील विविध गणेश मंडळे आणि सामाजिक संस्था यांच्या वतीने विविध भागांमध्ये रामनवमी निमित्त अनेक उपक्रम होणार असल्याचे देखील उत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले.
लवकरच यासंदर्भात कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध केली जाणार आहे.यामध्ये उत्सवामध्ये सर्व हिंदू परिवाराने सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.



