"रमजान ईद" व "अक्षय तृतीया "निमित्त कलाम फाउंडेशन व करमाळा मुस्लिम समाजाच्यावतीने निराधार नागरिकांना 'शिरखुर्मा' व 'पुरणपोळी'चे वाटप.. - Saptahik Sandesh

“रमजान ईद” व “अक्षय तृतीया “निमित्त कलाम फाउंडेशन व करमाळा मुस्लिम समाजाच्यावतीने निराधार नागरिकांना ‘शिरखुर्मा’ व ‘पुरणपोळी’चे वाटप..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : “रमजान ईद” “अक्षय तृतीया “निमित्त करमाळा शहरातील राशीन पेठ येथील ‘श्रीराम प्रतिष्ठान’च्या मार्फत सुरू असलेल्या “अन्नपूर्णा” योजनेमध्ये जेष्ठ वृद्ध व निराधार लोकांना भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे “शिरखुर्मा ” व ” पुरणपोळी “वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात जेष्ठ वृद्ध व निराधार लोकांना भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व करमाळा मुस्लिम समाज यांच्या वतीने ह.भ.प. साबळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठान चे विश्वस्त व जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे , चंकी चिवटे, ‘भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन’चे समीर शेख,रामा ढाणे, पिंटु शेठ बेग,सुरज शेख, जहाँ गीर बेग, जमीर सय्यद, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, महादेव गोसावी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!