शिवजयंती निमित्त केम येथे शिवरायांचा पालखी सोहळा आयोजित

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथे शिवजयंती निमित्त राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी काढण्यात आली. या निमित्त सकाळी आठ वाजता शिवशंभो वेशीवर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

त्यानंतर दर सोमवारी नित्यनेमाने शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. सजवलेल्या पालखीत शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात आली व पालखी सोहळ्याला सुरुवात झाली या पालखी सोहळ्यात सैराट,हलगी, पुठ्ठा ,समूळ वाद्य, तसेच तरूणानी हातात भगवे झेंडे घेतलेले होते या पालखी सोहळ्यात नूतन माध्यमिक विद्यालय,श्री ऊत्तरेश्वर हायस्कूल,शिवक्रिती इंग्लिश स्कूल सहभागी झाले होते नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर असे लेझीम खेळले छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली होती.

पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती गांधी चौकात नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पाळणा म्हटला. या पालखी सोहळ्याची मिरवणूक तब्बल चार तास चालली. पालखी सोहळा वेशीवर आल्यानंतर पालखीचे पुजन करून सांगता झाली. त्यांनंतर आलेल्या हजारो शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले य वेळी मोठया संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!