मृगनक्षत्र आगमना निमित्त ऊत्तरेश्वर बाबास चंदनऊटी लावण्याचा सोहळा संपन्न

केम (संजय जाधव) – येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानच्या परंपरेनुसार पूवीं पासून चालत आलेला चंदन ऊटि लावण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मृग नक्षत्राचे शुक्रवारचे उत्तररात्री नंतर शनिवार उजाडले पूवी रात्री १:०५मि, आगमन झाल्यावर दिवशीच रात्री१२वा,म्हणजे शनिवार८जून रोजी हा चंदन उटि लावण्याचा सोहळा झाला.
या अगोदर मंदिरात रात्री ९ पासून भजन होते.हिंदू संस्कृती प्रमाणे महादेवाचे श्री शिवलिंगाचे ग्रिष्मकालिन उन्हाच्या उष्णतेच्या दाह पासून रक्षण करण्याकरिता उन्हाळाच्या सुरूवातीपासून म्हणजे चैत्र प्रतिपदा गुढी पाडवा या दिवसापासून शिवलिंगाचे थंड पाण्याची संततधार तामृपत्रातून (गळती,सेवा)अष्टोप्रहार मृग नक्षत्राच्या आगमना पर्यंत ठेवली जाते आणी,, मृग नक्षत्राचे दिवसीय रात्री १२वा उन्हाळयाच्या उष्णतेने महादेवाच्या शरीरास झालेली दाहकता शितल सुगंधित करण्यासाठी चंदन,उटी लावली.
या चंदन उटी लावण्याच्या सोहळ्यासाठी,श्री,उत्तरेश्वर देवस्थानचे पंच कमिटि, सदस्य मोहन दौंड, विजय बप्पा, तळेकर, येवले,महंत जयंत गिरी महाराज, राहुल कोरे, रत्नदिप टोपे, सोनु गुरव, बळिराम गुरव,शिरीष कुराडे, चेतन वासकर, सर्व भजणी मंडळ,श्री ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटनेचे सदस्य उपस्थित होते सर्व भजणीमंडळ यांना श्री ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटनेच्या वतीने भोजणाची सोय करण्यात आली होती.




