उमरड येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने “जागर महामानवांच्या विचारांचा” हा चार दिवसांचा कार्यक्रम संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उमरड (ता.करमाळा) येथे सलग चार दिवस कार्यक्रम आयोजित केले होते, बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली “जागर माहामानवांचा” या कार्यक्रमांसह संपुर्ण जयंती उत्सवाचे नियोजन करण्यात आले.
यामध्ये 11 एप्रील रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला, तसेच 12 एप्रील रोजी प्रा.संपत गारगोटे मुंबई यांचे छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणी राजश्री शाहूमहाराज यांच्या विचारान वरती प्रकाश टाकणारे व्याख्यान झाले, 13 एप्रील रोजी प्रा.डाॅ. संजय चौधरी सर यांचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व संत तुकाराम महाराज यांचे विचार व्यक्त केले.
प्रा.नंदकिशोर वलटे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशातील जातीयवाद संपुन एससी, एसटी, ओबीसी, व ओपन वर्ग एकत्र येत आहे हे पटवून दिले, 14 एप्रील फोजमल पाखरे गुरुजींचे व्याख्यान झाले गावामध्ये चार दिवस मुख्य रस्त्यावर आकर्षक लाईटींगच्या सुंदर रोषणाई मुळे गावात झगमगाट दिसत होता.
14 एप्रील रोजी सकाळी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला सर्व बौद्ध समाज व ग्रामस्थांच्या उपस्थित बुद्ध वंदना घेऊन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम, सरपंच बापू पडवळे, सरपंच संदीप मारकड, पोलीस पाटील आंकुश कोठावळे
मा.सरपंच बापु चोरमले, मा.उपसरपंच गणेश चौधरी,विकास सोसायटी चे चेअरमन दत्तात्रय बदे, मेजर देवीदास पाखरे प्रा.नंदकिशोर वलटे,फोजमल पाखरे गुरुजी, दादासाहेब खंडाळे, श्रीमान चौधरी, जनार्धनमारकड, बालाजी मारकड, श्रीकांत मारकड, ग्रामपंचायत सदस्य भागवत कदम या सर्वांनी पुजा करून पुष्पहार घातला.
दि.14 एप्रील सायंकाळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली, मिरवणुकीमध्ये गावातील सर्व समाजाच्या लोकांनी विषेश स्त्रियांनी सुध्दा बँजोच्या तालावर ठेका धरला मिरवणुकीत अनेकांनी सहभाग नोंदविला. यानंतर सर्व समाजाला मेजर दासा पाखरे यांनी अन्नदान केले. आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष,सदस्य रूशी शिंदे,कैलास कदम, लखन कदम, विकास कदम, राजेंद्र शिंदे,सदा कदम, आबा कदम, राजू कदम,महिंद्र कांबळे, आमोल भोसले,उत्तरेश्र्वर कदम, लक्ष्मण दत्तू कदम,लक्ष्मण शिंदे, आजीनाथ भोसले, दादा कदम,सागर कदम, राजेश कदम, दासा गायकवाड,भिवा कदम,भीमराज कदम ,सूर्यकांत कदम,पप्पू कदम, वैजनाथ कदम या सर्वांनी जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.