आ.शिंदे यांच्या सुचनेवरुन पोटेगाव बंधारा पहाण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी तातडीने दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आमदार संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्यानिमित्त निलज या ठिकाणी आले असता ग्रामस्थांनी पोटेगाव बांधऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. लागलीच आ.संजयमामा शिंदे यांनी अधिक्षक अभियंता डॉ धुमाळ मुख्य (विप्र) पुणे यांच्याशी फोनवरून सूचना केल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या दिवशी डॉ धुमाळ,धी. बा. मुख्य अभियंता धीरज साळे, अधीक्षक अभियंता सोलापूर,एम. टी. जाधवर कार्यकारी अभियंता सोलापूर,एस. के. आवताडे उप अभियंता करमाळा असे सर्व वरिष्ठ अधिकारी पोटेगाव च्या बांधऱ्याची पहाणी करण्यासाठी आले .
करमाळा तालुक्यातील सर्वात जुना असणारा (30 वर्षांपूर्वी ) सीना नदीवर झालेला पोटेगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे, या बांधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागण्या केल्या जात होत्या. नादुरुस्त असणारा हा बंधारा अतिवृष्टीमुळे निकामी झाला होता. या बांधऱ्यावरून मुख्यत्वेकरून बाळेवाडी, पोथरे, पोटेगाव, निलज आदी गावांना त्याचा लाभ मिळत होता.
परंतु गेल्या 10 ते 15 वर्षांपासून या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठत नसल्यामुळे त्याचा फायदा कोणालाही होत नव्हता. त्यामुळे पोटेगाव, निलज, बाळेवाडी येथील ग्रामस्थांनी याबाबत आपल्या समस्या मांडल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉ धुमाळ,धी. बा. मुख्य अभियंता धीरज साळे, अधीक्षक अभियंता सोलापूर,एम. टी. जाधवर कार्यकारी अभियंता सोलापूर,एस. के. आवताडे उप अभियंता करमाळा असे सर्व वरिष्ठ अधिकारी पोटेगाव च्या बांधऱ्याची पहाणी करण्यासाठी आले. या दुरुस्तीसाठी जवळपास 4 कोटी रुपये निधी ची आवश्यकता आहे. सदर निधी मधून या बंधाऱ्याचे काम मजबूत होईल अशी अपेक्षा या भागातील नागरिक करीत आहेत.
