‘एक सायकल- वाडी वस्तीवरील बहिणीसाठी’ या योजनेची उत्तरेश्वर कॉलेज मध्ये सुरवात – शिक्षण प्रेमींना मदतीचे आवाहन
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील श्री ऊत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मध्ये दुरून वाडी-वस्ती वरून येणाऱ्या विद्यार्थिनींची कॉलेजला येताना होणारी प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन कॉलेजने सुशिला देवी साळुंखे सायकल बॅंक योजनेची सुरुवात केली आहे. या सायकल बॅंक योजनेसाठी एक-एक सायकल जमा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाइस चेअरमन व संचालकांनी मिळून दोन सायकलसाठी आठ हजार रूपयाची रक्कम संचालिका शर्मिला साळुंखे यांच्या हस्ते चेअरमन हितेंद्र साळुंखे, व्हाइस चेअरमन दिपक जाधव यांच्या उपस्थित दिले.
या वेळी संचालक उमेश जाधव, थोपटे, राहुल कुंभार, शशिकांत पाटील दत्तात्रय दळवी राजगोंडा सुतार विनोद पन्हाळकर सुधाकय पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
एक सायकल वाडी वस्तीवरील बहिणीसाठी या योजनेसाठी शिक्षण प्रेमी दात्यांनी एक-एक सायकल द्यावी असे आवाहन या योजनेचे काम पाहणारे प्रा. मच्छिंद्र नांगरे यांनी यावेळी केले आहे.