व्हॉट्सअॅपवर धार्मिक भावना भडकावणारे स्टेटस ठेवल्याने करमाळा तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल

करमाळा(दि.२७) : करमाळा तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथील एका युवकाने व्हॉट्स अॅपवर धार्मिक भावना भडकावणारे स्टेट्स ठेवल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण बबन साखरे (वय ३०, रा. राजुरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी लक्ष्मण साखरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझे मित्र नागेश पंडीत वाळुंजकर यांनी माहिती दिली की, शेलगाव वांगी येथे कोणीतरी हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे स्टेटस व्हॉट्सअॅपवर पोस्ट केले आहे. त्यानंतर मी नागेशकडून स्टेटसचा फोटो मिळवून पाहणी केली असता, अजहर आसिफ शेख (वय २८, रा. शेलगाव वांगी, ता.करमाळा जि.सोलापूर) याने आपल्या मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवले असल्याचे निदर्शनास आले.

व्हाट्सअॅपवर स्टेटस ठेवून सामाजिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केली असल्या कारणाने मी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली असल्याचे साखरे यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.

फिर्यादीत दिलेला स्टेट्स चा मजकूर
नाम पूछ कर मुसलमानों पर हमला करना उनसे जबरदस्ती “जय श्री राम” बुलवाना, चलती ट्रेन मे JRPF द्वारा नाम पूछ पूछ कर छाती पर गोली मार देना, गाय और बीफ के नाम पर बीच सडकपर पीट पीट कर उनकी बेरहमी से मॉब Lynching कर हत्या करना और कश्मीर मे नाम पुछकर लोगोंपर गोली चलाना, दोनो मे कोई अंतर नही हैं, वोभी आतंकवाद हैं और ए भी आतंकवाद है,गुड टेररिज्म, Bad टेररिज्म कोई जगह नही होनी चाहीए.
सदर स्टेटस मधून मुस्लिमांवर होणारे अन्याय देखील एक प्रकारचा आतंकवादच आहे हे मला सांगायचे होते परंतु लोक याला दहशतवादी हल्ल्याचे समर्थन केले असल्याचे समजत आहेत, असे अझहर शेख कडून सांगण्यात येत आहे.



