घराच्या कारणावरून सात जणांकडून एकास बेदम मारहाण
करमाळा (संदेश प्रतिनिधी)- आमचे घर वारंवार सांगूनही परत का देत नाही; या कारणावरून सात जणांनी एकास बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार १७ जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता वांगी नं. २ येथे घडला आहे. यात चैतन्य दत्तात्रय खराडे (रा. वांगी नं.२) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की १७ जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता माझे पती आमच्या घराच्या समोर असताना घराशेजारी असणारे अतुल विठ्ठल गुटाळ, राहुल विठ्ठल गुटाळ, संतोष गणपत गुटाळ, वैभव संतोष गुटाळ, ज्ञानेश्वर राजेंद्र गुटाळ, तुकाराम राजेंद्र टाळ (सर्व रा. वांगी नं. २) तसेच बाळासाहेब जाधव (जेऊर) यांनी आडविले व तुझ्या वडीलांनी आमचे घेतलेले घर परत दे.. असे म्हणून बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीसांनी सात जणाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुलकर हे करत आहेत.