बिटरगाव (श्री) येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन
करमाळा(संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथे २६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या कीर्तन महोत्सवामध्ये प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यासह इतर ३ किर्तनकारांचे कीर्तन होणार असून चार प्रवचनकारांची प्रवचने होणार आहेत. भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला असून बिटरगाव (श्री) या गावचे सरपंच अभिजीत मुरूमकर व बिटरगाव (श्री) ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कीर्तन महोत्सव आयोजित केला गेला आहे.
या कीर्तन महोत्सवात ह.भ.प जय श्रीराम ह.भ.प तुळशीराम काळे ह.भ.प प्राची सरवदे, ह.भ.प विलास महाराज शिंदे या चौघांची प्रवचने होणार असून ह.भ.प अक्रूर महाराज साखरे, ह.भ.प संदीप महाराज खंडागळे, ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील व ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज शास्त्री आदींची किर्तनसेवा होणार आहे.
२६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान पहाटे चार ते सहा या वेळेत काकडा आरती, सकाळी सात ते अकरा वेळेत ग्रंथराज शिवलीला अमृत पारायण, सायंकाळी ५ ते ६ यावेळेत प्रवचन होणार, सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, रात्री ९ ते ११ या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे व रात्री ११ ते ४ या दरम्यान जागर होणार आहे. ३० तारखेला सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांची काल्याचे किर्तन होणार आहे. या महोत्सवाचे व्यासपीठ चालक नाना महाराज पठाडे हे असणार आहेत. या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका खाली दिलेली आहे.



