क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने किशोरी हितगुज मेळाव्याचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंचायत समिती शिक्षण विभाग,करमाळा आयोजित तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार मा.संजयमामा शिंदे यांचे पुतणे युवक नेते,माढा पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, तहसीलदार सौ.शिल्पा ठोकडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कामोणे शाळेची विद्यार्थीनी प्राची शिंदे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.सुनिता दोशी व ॲड.अपर्णा पदमाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आशपाक जमादार, सुरताल संगीत विद्यालयाचे बाळासाहेब नरारे, माजी विस्तार अधिकारी अनिल बदे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमंत्रक पं.स.गटशिक्षणाधिकारी मा.राजकुमार पाटील साहेब,पं.स.गटविकास अधिकारी मा.देवीदास सारंगकर साहेब,विस्तार अधिकारी मा.सुखदेव नीळ,विस्तार अधिकारी मा.जयवंत नलवडे व तसेच जिल्हा परीषदेचे शिक्षक-शिक्षिकेत्तर कर्मचारी,विद्यार्थीनी यांनी या कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!