रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठानमार्फत 'रोजा इफ्तार' पार्टीचे आयोजन... -

रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठानमार्फत ‘रोजा इफ्तार’ पार्टीचे आयोजन…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा ता.१९ : रमजान निमित्त जेऊर (ता.करमाळा) येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठान तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जेऊर येथील मुस्लिम महिलांनी इफ्तार पार्टीस खूपच चांगला प्रतिसाद दिला अशी माहिती लोकस्वराज प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ॲड.सविता शिंदे यांनी दिली.

हिंदू मुस्लिम ऐक्य व सौहार्द टिकविणे व वाढविणे यासाठी मुस्लिम महिलांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी इफ्तार पार्टी सारखे उपक्रम उपयुक्त ठरतात. मुस्लिमतरांनी विशेषतः देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंनी असे उपक्रम राबवले पाहिजेत असेही ॲड. सविता शिंदे यांनी म्हटले आहे.

मुस्लिम पुरुषांसाठी बहुतेक वेळा इफ्तार पार्टीचे औओजन केले जातेच पण महिलांसाठी मात्र तसे होत नाही. महिलांना देखील अशा उपक्रमात सहभागी करून घेतले पाहिजे या हेतूने आपण रोज इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. मागील वर्षीही करमाळा येथे आपण महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते अशी माहितीही ॲड. सविता शिंदे यांनी दिली. जेऊर येथे प्रथमच असा उपक्रम राबविल्या बद्दल मुस्लिम महिलांनी आनंद व्यक्त केला.जेऊर येथील उपक्रमासाठी आरती शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रियंका खटके, सुरेखा शिंदे इ. महिलांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!