श्रीराम नवमी उत्सवानिमित्त कंदर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन..

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे :
कंदर : कंदर (ता.करमाळा) येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शुक्रवार ता.24 पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन सहा ते सात अभिषेक 7 ते 11 या वेळेत शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण अकरा ते बारा मध्ये स्थानिक कांचे प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सात ते दहा या वेळेत राम कथा राञी 12 ते पहाटे चार पर्यंत हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत.
राम कथेचे प्रवक्ते हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज निंबाळकर हे आहेत .तसेच गुरुवार 30 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत ह भ प काका भोसले महाराज यांचे रामनवमीनिमित्त कीर्तन होईल. तसेच शुक्रवार 31 रोजी सकाळी नऊ ते 11 या वेळेत ह भ प अनिरुद्ध महाराज निंबाळकर यांचे काल्याचे किर्तन होईल. तरी कार्यक्रमासाठी कंदर व परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
