कंदर येथे शनिवारी सर्वधर्मीय वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन -

कंदर येथे शनिवारी सर्वधर्मीय वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन

0

कंदर (संदीप कांबळे): करमाळा तालुक्यातील कंदर येथे येत्या शनिवारी (दिनांक १ नोव्हेंबर) श्वेता वधू-वर सूचक केंद्रा तर्फे भव्य सर्वधर्मीय वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची माहिती आयोजक बाळासाहेब सरडे यांनी दिली.

या मेळाव्यात इंजिनियर, डॉक्टर, वकील, शासकीय अधिकारी, व्यवसायिक तसेच शेतकरी वर्गातील सुयोग्य वधू-वरांची स्थळे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. योग्य जोडीदाराच्या शोधात असलेल्या पालक व नातेवाईकांसाठी हा मेळावा एक अवसर सोन्याचा ठरणार आहे.

सदर मेळावा सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सद्गुरु मंगल कार्यालय, कंदर येथे आयोजित केला आहे. इच्छुकांनी सहभागासाठी ४ ते ६ प्रिंट फोटो व बायोडाटा सोबत आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  बाळासाहेब सरडे (मो. ९९२३४०९०३४) यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!