भारत प्रायमरी स्कूल जेऊर मध्ये बाल दिंडीचे आयोजन - Saptahik Sandesh

भारत प्रायमरी स्कूल जेऊर मध्ये बाल दिंडीचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) –  आषाढी वारीचे औचित्य साधून जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल जेऊर व भारत माँटेसरी मध्ये बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये हे आयोजन करण्यात आले होते .सर्वच विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशांमध्ये या दिंडीत सामील झाले होते .यामध्ये मुलांनी पांढरा शर्ट पांढरी विजार, कपाळावर टिळा,डोक्यावर फेटा, तर मुलींनी साड्या घातल्या होत्या. आपल्या डोक्यावर तुळशी घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या.

ही दिंडी भारत शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणातून सुरू झाली. यावेळेस संतांचा वेश धारण केलेली मुले व मुली विठ्ठल रुक्मिणीच्या बरोबर आकर्षण ठरले होते. विठ्ठल रुक्मिणीची पालखी घेऊन ही दिंडी संपूर्ण गावातून फेरी मारून यावेळी भजन म्हणत ,टाळ वाजवत विद्यार्थ्यांनी या दंडीत सहभाग नोंदवला .या दिंडीला संस्थेचे सदस्य माननीय संजय कुमार दोशी यांनी राजगिऱ्याच्या वड्या व माजी विद्यार्थी आणि पालक तुकाराम टकले यांचे कडून शेंगदाणा लाडू वाटप करण्यात आले .तसेच अनेक पालकांनीही या दिंडीमध्ये सहभाग नोंदववला. जेऊर मधील पालकांनी ठीक ठिकाणी या दिंडीचे स्वागत केले . हुबेहूब झालेले संत व विठ्ठल रुक्मिणी,तसेच हुबेहूब झालेले वारकरी या सर्वांचे कौतुक जेऊर परिसरांमधून होत आहे, यावेळी मृदुंग वादक श्री भागवत सरक यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या दिंडीस संस्था सचिव श्री अर्जुन सरक यांनी उपस्थित राहून दिंडीचे कौतुक केले.

या दिंडीच्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार लोकनेते नारायण आबा पाटील,उपाध्यक्ष राजू शेठ गादिया तसेच सचिव अर्जुन सरक,संचालक श्री पृथ्वीराज पाटील सरपंच,जेऊर या सर्वांनी विशेष अभिनंदन केले.

यावेळी संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव संत सोपान काका, संत रामदास,जनार्दन स्वामी , संत सावता माळी अशा सर्व संतांच्या विशेष भूमिका विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे साकारल्या. यावेळी मुलींनी विठ्ठलाच्या गाण्यावर बसवलेले नृत्य सादर केले.


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मुख्याध्यापक श्री दीपक व्यवहारे सर, श्री उत्तरेश्वर गरड सर, श्री अमोल पाटीलसर ,अनिता देशमुख मॅडम ,नितीन पाटील सर,वर्षा भोसले मॅडम,गणेश हजारे सर .किशोर गुळमे सर ,मुमताज शेख मॅडम, सरडे मॅडम या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
एकूणच भारत प्रायमरी स्कूल च्या दिंडीमुळे जेऊर मधील वातावरण अतिशय भक्तीमय झाले होते…

सदर प्रमाणपत्रासाठी खालील कागदपत्रे व अटी दिलेल्या आहेत –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!