केम येथे २८ ऑक्टोबरला ‘देशी गाईंचे पूजन’ सोहळ्याचे आयोजन

केम (संजय जाधव) – राज्य शासनाने ३० सप्टेंबर रोजी देशी गायींना राज्य मातेचा दर्जा देण्यात आला आहे. याबद्दल व वसुबारसचे औचित्य साधून दिनांक 28 ऑक्टोबर रोजी केम येथे देशी गाई पूजन सोहळा (गो-पूजन) आयोजित केला असल्याची माहिती मंहत जयंतगिरी महाराज व गोरक्षक केम ग्रामस्थ यांनी दिली.
यानिमित्त शिवसंभो वेसी वरील राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून गोमातेची दिंडी ठीक नऊ वाजता निघणार आहे या दिंडीत भजनकरी, झेंडे करी सहभागी होणार आहेत. ही दिंडी उत्तरेश्वर मंदिराच्या पटांगणावर पोहोचल्यानंतर दिंडीत सहभागी झालेल्या देशी गाईचे पूजन श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते पूजन करून सर्व गाईंना पुरणपोळी खाऊ घालण्यात येणार आहे. यावेळी ट्रस्ट सर्व सदस्य केम ग्रामस्थ गोरक्ष उपस्थित राहणार आहेत. तरी या दिंडी सोहळ्यासाठी गोरक्षकाने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.






