केम येथे १० सप्टेंबरला भव्य नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
करमाळा (दि.७) – केम येथील महात्मा फुले शिक्षण व विकास मंडळ संस्थेचे संस्थापक स्व. शिवाजी (बापू) तळेकर यांच्या तृतीय पुण्यसमरणार्थ येत्या मंगळवारी दि.१० सप्टेंबर रोजी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबीर केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयात आयोजित केले गेले आहे.
या शिबिराविषयी अधिक माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, पुणे येथील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर आयोजित केले गेले आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील व्यक्तींची मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. चष्म्याचा नंबर आलेल्या व्यक्तींना मोफत चष्मे वाटप केले जाणार आहे व मोतीबिंदू असलेल्या व्यक्तींना पुण्यातील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या जेवणाची व राहण्याची सोय देखील संस्थेमार्फत केली जाणार आहे. मोतीबिंदू व्यतिरिक्त इतर नेत्रदोष असणाऱ्या व्यक्तींना देखील देसाई नेत्र रुग्णालयात पाठवले जाणार आहे व अशा रुग्णांवर सवलतीच्या दरामध्ये उपचार केले जाणार आहेत. या शिबिराला येताना आधार कार्ड व रेशन कार्ड ची प्रत आणावी अशी माहिती आयोजकांनी दिली.
या शिबिरामध्ये नोंदणी करण्यासाठी पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे देखील आवाहन आयोजकांनी केले आहे. ए पी ग्रुप कार्यालय केम – 7517558555 महावीर तळेकर केम – 9822609297 गोरख पारखे केम – 9975639789, प्रणव इलेक्ट्रॉनिक्स केम 9921384555, श्रुती दूध संकलन व शीतकरण केंद्र, केम – 9021647966.
या शिबिराचा केमसह परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार विजयराव तळेकर यांनी केले आहे.