करमाळ्यात १५ ऑगस्ट रोजी भव्य 'हिंदू -मुस्लिम एकता रॅली' चे आयोजन -

करमाळ्यात १५ ऑगस्ट रोजी भव्य ‘हिंदू -मुस्लिम एकता रॅली’ चे आयोजन

0

करमाळा (दि.१४) – करमाळ्यात उद्या  गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी भव्य ‘हिंदू -मुस्लिम एकता रॅली’ चे आयोजन करण्यात आले असून करमाळा तालुक्यातील तमाम हिंदू – मुस्लिम बांधवांनी स्वातंत्र्यदिनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन जगताप गटाचे खरेद्री -विक्री संघाचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी समाजमाध्यमा द्वारे केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जगताप म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवण्याचा व सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी ‘हिंदू -मुस्लिम एकता रॅली ‘ चे आयोजन केले आहे.१५ ऑगस्ट रोजी शहरातील शालेय , महाविदयालयीन विद्यार्थी -विद्यार्थीनी , शिक्षक – शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचाऱ्यां सह शहर व तालुक्यातील हिंदू – मुस्लिम धर्मीय युवक -युवतीं सह बुजर्ग नागरिकांनी सर्वात मोठा राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्यदिनी ‘एकता रॅली ‘ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘हम सब एक है’ व ‘हिंदू – मुस्लिम है भाई -भाई ‘ या उक्तींप्रमाणे सामाजिक सलोखा व एकजूटीचे दर्शन घडवावे व मोठ्या उत्साहाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात सहभागी व्हावे.

ही रॅली दि .१५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा महात्मा गांधी विद्यालय येथून निघणार असून सदर रॅलीचा मार्ग – महात्मा गांधी विद्यालय – महाराणा प्रताप स्मारक – महात्मा गांधी स्मारक – जयमहाराष्ट्र चौक – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!