पोथरे येथे १४ नोव्हेंबरला ‘स्वरदिप दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोथरे (ता.करमाळा) १४ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता स्वरदिप दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे पोथरे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम पोथरे येथील शनी मंदिर परिसरामध्ये होणार आहे. या कार्यक्रमावेळी पार्श्वगायक संदीप पाटील प्रस्तुत भव्य संगीतमय पहाट हा भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीतांचा समावेश असलेला कार्यक्रम होणार आहे. यावेळी पार्श्वगायिका रोहिणी मॅडम,निवेदक उद्धव काळापहाड,कृष्णा जाधव,संगीत संयोजक दिलावर शेख,पॅड&ड्रम वादक गौतम गुजर, तबला वादक ललित भूमकर,ढोलकी वादक सोनू साळवे यांच्यासह राज्यातील प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहून कार्यक्रम सादर करणार आहेत.
याच ठिकाणी २ हजार १२१ दिव्यांचा दिपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे, तसेच उपस्थित महिला वर्गासाठी ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक ग्रामस्थांनी दिली आहे. या कार्यक्रमावेळी तहसीलदार विजयकुमार जाधव,पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे – पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
खेळ पैठणीचा कार्यक्रमासाठी विघ्नेश इंटरप्रायझेस पुणे,हॉटेल चिवटे फॅमिली रेस्टोरंट करमाळा,देवी ज्वेलर्स यांनी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमांना ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.