१२ मार्चला करमाळा तालुक्यातील महिलांसाठी ‘पिंकथोन’ या तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

करमाळा : जागतिक महिला दिनानिमित्त करमाळा मेडिकोज गिल्ड या संघटनेमार्फत १२ मार्चला “अबला नव्हे,सबला नारी …सशक्त नारी …आरोग्य दक्ष नारी” हे ब्रीद वाक्य घेऊन ‘पिंकथोन’ या तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये अठरा वर्षांवरील सर्व महिला सहभागी होऊ शकतात. या स्पर्धा रविवारी (१२ मार्च) सकाळी ६ वाजता मांगी एमआयडीसी अंतर्गत रस्त्यावर होणार आहेत. यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन यावर्षीच्या संघटनेच्या लेडीज विंग च्या अध्यक्ष डॉ सौ चेतना शिंदे, संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष सौ डॉ वर्षा करंजकर, उपाध्यक्ष डॉ प्राजक्ता पाठक, व आयोजक सौ डॉ मनीषा माळवदकर यांनी केले.
या स्पर्धेत सर्व सहभागी सदस्यांना टीशर्ट व मेडल देण्यात येणार आहे तर प्रथम तीन विजेते व दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना करमाळा मेडिकोज गिल्ड संघटनेतर्फे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून ज्योतीचंद भाईचंद सराफ व दिगंबररावजी बागल पेट्रोल पंप असणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ यशवंत व्हरे, उपाध्यक्ष डॉ सुहास कुलकर्णी व आयोजक डॉ हर्षवर्धन माळवदकर यांनी केले.
