केम येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन -

केम येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.

यामध्ये दिनांक 12 ते 19 अखेर पर्यंत श्रीराम संगीत कथा कथाकार ह. भ.प. सुधीर महाराज वालवडकर व त्यांना संगीत साथ देणारे गायक अरविंद रत्नपारखी (अकोला) रामेश्वर आहेरकर (अकोला) बासरी वादक प्रशांत व्हटकर (नागपूर) तबला वादक विठ्ठल पाटील (तालमणी) आदीजण असणार आहेत.

या सप्ताह मध्ये अन्नदान होणार आहे अन्नदाते नवनाथ खानट, शिवाजी मुळीक, रमेश कांतीलाल तळेकर, कुंडलिक देवकर, संतोष खानट, समीर तळेकर, श्रीकांत तळेकर, धनंजय घाडगे यांच्यावतीने करण्यात येणार आहे. तसेच दि.१९ रोजी शिवजयंती दिवशी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार आहे. नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. सुधीर महाराज वालवडकर यांचे कीर्तन दुपारी बाराला होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येईल. यानंतर महेश तळेकर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येईल तरी केम व परिसरातील शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!