महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रमांसह मिरवणूकीचे आयोजन

करमाळा (दि.२६) – महान योद्धा श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या ४२५ व्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांची सुरुवात बुधवार, दि. २८ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुतार गल्ली येथे आयोजित रक्तदान शिबिराने होणार आहे.
गुरुवार, दि. २९ मे रोजी सकाळी ८.३० वाजता मंगळवार पेठ, करमाळा येथील महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्यास अभिषेक विधी पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता मंगळवार पेठेतच दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे.

दुपारी १२ ते ३ दरम्यान सुतार गल्ली येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून, यानंतर दुपारी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत हलगी, लेझीम यांसारखी पारंपरिक वाद्ये तसेच बॅन्जो आणि डीजे यांचा समावेश असणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन हिंदूसूर्य महाराणा प्रताप सिंह उत्सव समिती, करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



