उद्या सखी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील नगरपालिका व ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त उद्या (ता. १२) दुपारी दोन वाजता सखी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरूप्रसाद मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. यावेळी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे; असे आवाहन ग्राहक पंचायतच्या जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख माधुरी परदेशी यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल दुधे, पंचायत समितीच्या प्रशासन अधिकारी माधुरी सपाटे, लघुपाटबंधारे अभियंता माधुरी दिवाण तसेच ॲड. शशिकांत नरूटे, चक्रधर पाटील व साहित्यिक भीष्माचार्य चांदणे हे मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम महिलांसाठी बंदीस्त व सुरक्षित आहे. त्यामुळे शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; असेही आवाहन आयोजिका स्वाती माने, निलीमा पुंडे, ललिता वांगडे, रेखा परदेशी, मंजिरी जोशी, निशीगंधा शेंडे, सारीका पुराणिक यांनी केले आहे.

