करमाळा येथे १७ फेब्रुवारीला तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

करमाळा(दि.१५): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त करमाळा येथे १७ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून पोलीस निरीक्षक विनोद घुगे मुख्याधिकारी सचिन तपसे रिपब्लिकन पार्टी संस्थापक देवा लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा करमाळा शहरातील नागनाथ मंदिरजवळ कर्जत रोड येथे होणार आहे. करमाळा (सुमंतनगर) येथील पंचशील स्पोर्ट्स अँड सोशल प्रतिष्ठान यांनी या स्पर्धेचे आयोजित केल्या आहेत.
याचबरोबर या प्रतिष्ठानने १८ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते मंगळवार पेठ येथील नगरपालिका शाळा नंबर ४ व रंभापुरा येथील नगरपालिका शाळा नंबर ३ येथे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, भव्य मिरवणूक व मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण आयोजित करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.





