पांगरे ग्रामपंचायतीचे नुतन उपसरपंच पै. महेश टेकाळे यांचा सत्कार  संपन्न - Saptahik Sandesh

पांगरे ग्रामपंचायतीचे नुतन उपसरपंच पै. महेश टेकाळे यांचा सत्कार  संपन्न



करमाळा/संदेश प्रतिनिधी

करमाळा,ता.15: पांगरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी  आमदार संजय मामा शिंदे  गटाचे  पै.महेश शिवाजी टेकाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  त्यानिमित्त  त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रहार धरणग्रस्त संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष पै.महेश शेळके, ग्रामसेवक श्री. कांबळे  तसेच पांगरे गावचे ज्येष्ठ नागरिक मुगाजीराव येवले , पांडुरंग अण्णा उघडे, करमाळा वकील संघाचे माजी अध्यक्ष व आदिनाथ चे माजी संचालक ॲड.दत्तात्रय सोनवणे , मकाई चे संचालक सचिन  पिसाळ, पांगरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हॉइस चेअरमन पै.बाळासाहेब गुटाळ, ग्रामपंचायतचे सदस्य, माजी उपसरपंच ग्रा.प.सदस्य श्री.गणेश वडणे,ग्रा.प.सदस्य सौ.मयुराताई पिसाळ,सौ.मनीषाताई गायकवाड, युवा उद्योजक श्री. विवेक पाटील,श्री.सुशांत वडणे,श्री.धनंजय गायकवाड,  नाथा काळे,श्री.गोपाळ कोळी श्री.मच्छिंद्र उघडे,श्री.महादेव गव्हाणे,श्री.गोरख सोनवणे अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना उपसरपंच श्री.टेकाळे यांनी पांगरे गावाची सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहू गोरगरीब, सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांच्याअडीअडचणीसाठी सदैव तत्पर हजर राहून मार्ग काढू, ग्रामपंचायतीने दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून काम करू असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी आभार महेश शेळके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!