तळेकर विद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

केम(संजय जाधव): केम येथील ‘महात्मा फुले शिक्षण व विकास मंडळ केम’ या संस्थेचे अध्यक्ष कै. शिवाजी (बापू) तळेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त केम परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आज राजाभाऊ तळेकर विद्यालय व श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर च्या मैदानावर उत्साहात पार पडली.

सदर स्पर्धेचे उद्घाटन केम पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री गुटाळ यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री महेश तळेकर , संस्थेचे सचिव व राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज (विनोद) तळेकर संस्थेचे सदस्य व श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर, मा. श्री महावीर (आबा) तळेकर, उत्तरेश्वर वसतीगृहाचे अधीक्षक श्री महानवर सर, ग्रामपंचायत सदस्य श्री विजयसिंह ओहोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केम, नूतन प्रशाला व आश्रम शाळा केम, श्री उत्तरेश्वर विद्यालय केम, शारदाताई पवार माध्यमिक विद्यालय केम आणि राजाभाऊ तळेकर विद्यालय व श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर केम मधील 450 विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने ड्रॉइंग पेपर, कलर पेटी, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, इत्यादी साहित्य मोफत देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि सर्जनशीलताचा वापर करून सुबक चित्रे काढली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. गटातील प्रथम तीन विद्यार्थ्यांना 30 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले.


