शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात संपन्न


 केम (संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल मधे सालाबाद प्रमाणे यावर्षीही पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यामधे विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानदेव, संत सोपान, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत जनाबाई इत्यादी भूमिका साकारल्या सोहळ्याची सुरुवात पालखीचे पूजन सर्व शिक्षकांच्या हस्ते करून केम गावातून ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत पालखी काढण्यात आली यावेळी विठ्ठल मंदिर व ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर महाराज मंदिरात जाऊन सर्वांनी दर्शन घेतले त्याचबरोबर विद्यार्थी व शिक्षकांनी वारकरी संप्रदायातील पारंपरिक खेळ फुगडी हा खेळ खेळला . दिंडी शाळेत परत आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना फराळ देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.

ग्रामीण भागात “गुणवत्ता हे एकमेव उद्दिष्ट” या नावाने ओळखले जाणारे शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कूल नेहमीच महाराष्ट्रातील सर्व सण व संस्कृतीचा वारसा जपण्याचा व तो वारसा विदयार्थ्यामधे रुजविण्याचा प्रयत्न करत असते. हा पालखी सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी संस्था सचिव व मुख्याध्यापक श्री सुहास काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!