एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांचा पांडे ग्रामस्थांनी केला सत्कार -

एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांचा पांडे ग्रामस्थांनी केला सत्कार

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील पांडे ग्रामस्थांच्या वतीने ५ एप्रिल रोजी नुकतेच MBBS चे शिक्षण (वैद्यकीय शिक्षण) पूर्ण केलेल्या डॉ.आदेश जाधव व डॉ.ओंकार गोडे यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार पांडे गावातील देवीच्या मंदिरात करण्यात आला.

त्यांच्या सत्कार समारंभावेळी पांडे गावातील ज्येष्ठ नागरिक वसंत भगत, भागवत दुधे सर, सुभाष वीर, ऋषिकेश मेंढापुरे, समीर तांबोळी अंगद जाधव आणि गावांमधील युवा वर्ग उपस्थित होते. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आदेश जाधव हा पांडे गावचा सुपुत्र असून तो सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन व गरिबीतून पुढे आलेला विद्यार्थी आहे. त्याने आपल्या भावाचे महेश जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन ही डिग्री पूर्ण केले आहे. त्याचे शिक्षण SMBT Medical College धामणगाव नाशिक येथे झाले आहे. या सत्कारा वेळी आदेशचा मित्र डॉ. ओंकार गोडे (अकोले) उपस्थित असल्याने त्यांचा देखील सत्कार गावकऱ्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!