पंढरपूर डाक विभागात विमा प्रतिनिधींची मुलाखतीद्वारे नेमणूक सुरू
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – टपाल जीवन विमा योजना व ग्रामीण टपाल जीवन विमा योजने अंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी थेट विमा प्रतिनिधी यांची नेमणूक अधीक्षक डाकघर, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सी. बी. भोर यांनी दिली.
थेट मुलाखतीकरिता इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक डाकघर, पंढरपूर विभाग, पंढरपूर येथे दि. ३० व ३१ जानेवारी रोजी रोजी सकाळी १० ते संध्या. ४ वाजेपर्यंत लेखी अर्ज व वरील कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना इच्छुक उमेदवारांनी आपल्यासोबत अधीक्षक डाकघर, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांच्या नावाने केलेला लेखी अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मतारखेचा दाखला आदी मूळ कागदपत्रे व त्या कागदपत्रांची साक्षांकित प्रत, फोटो व संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे. यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असावे. उमेदवार हा १० वी पास असावा तसेच इच्छुक उमेदवारास विमा विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे. विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन / प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.