पांडूरंग सोरटे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथील दिवाणी न्यायालयातील सेवानिवृत्त कर्मचारी व श्रीदेवीचामाळ येथील रहिवाशी पांडूरंग देविदास सोरटे (वय-८३) यांचे १ मार्च रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांचे मागे तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
१९६५ मध्ये स्व. सोरटे यांनी जिल्हा न्यायालयात नोकरीस सुरूवात केली होती. त्यानंतर माढा, पंढरपूर, माळशिरस याठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. करमाळा येथील दिवाणी न्यायालयात काम करत असताना १ मार्च २००० साली सेवानिवृत्त झाले. प्रकाश, संतोष, सचिन सोरटे यांचे ते वडील होते. तर प्रसिध्द कवी नारायण देविदास सोरटे यांचे ते बंधू होत.