पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे – प्रा.सुनील भांगे…

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे…
कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील श्री शंकरराव भांगे मालक ,प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेची सन २०२३-0२४ या शैक्षणिक वर्षाची पहिली शिक्षक- पालक सहविचार सभा नुकतीच पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी दादा कामटे तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय चव्हाण उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या सहशिक्षिका राखुंडे यांनी केले. तर सूत्रसंचालन सहशिक्षिका मोहिनी नवले यांनी केले. यावेळी शाळेच्या प्रगती विषयी मुख्याध्यापका रेश्मा उबाळे यांनी सविस्तर माहिती दिली.
तसेच पालकांमध्ये नितीन आरकिल़े दादासाहेब पांडव दादा कामटे दत्तात्रय चव्हाण आदी जणांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना प्राध्यापक सुनील भांगे म्हणाले की आठ तास फक्त मुले शाळेत असतात. बाकीची वेळी ती घरीच असतात त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक बनले आहे.
मोबाईलचा वापर कमी प्रमाणात व्हायला पाहिजे ..कारण मोबाईल मुळे संवादाचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांसोबत मैत्री करा त्यांना व्यायाम छान छान गोष्टी याविषयी माहिती द्या. मुलांना चांगले शिक्षण देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करीत आलेलो आहे .त्यामुळेच आपल्या प्रशालेतील मुले गेल्या वर्षी राज्यस्तरीय परीक्षेत चमकले आहेत. यावर्षीही जास्तीत जास्त मुले राज्यस्तरीय परीक्षेत चमकवण्यासाठी आपल्या प्रशालेतील सर्व शिक्षक प्रयत्न करतील .त्यामुळे पालकांनी निश्चित रहावे. या शिक्षक पालक सहविचार सभेला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार सहशिक्षिका गायकवाड यांनी मानले.





