गाणगापूर येथील गुरुचरित्र पारायणास करमाळा तालुक्यातील भाविकांचा सहभाग

केम (संजय जाधव) : गाणगापूर येथे १ जानेवारी रोजी एक दिवसीय गुरूचारित्र पारायण आयोजीत करण्यात आले होते. या पारायणासाठी तालुक्यातील करमाळा, जेऊर, वीट, वांगी हिवरवाडी, सरपडोह, येथील भाविकांनी सहभाग नोंदवला. या मध्ये केम येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ च्या ४२ महिला भाविक उपस्थित होत्या.
हे पारायण अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर शाखा श्री क्षेत्र गाणगापूर दत्तधाम येथे अष्टपिठाचे पिठाधीश श्री आणासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.





