पाथुर्डी जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव निळ, गटविकास अधिकारी मनोज राऊत हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करावेत जेणेकरून अभ्यासाबरोबरच त्यांच्या कलागुणांचा विकास होईल असे प्रतिपादन केले .विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने केली.
विद्यार्थ्यांनी कलाविष्काराचे 33 प्रकारची गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.ग्रामस्थ व प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांना भरघोस बक्षीसे देऊन त्यांचे मनोबल वाढविले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सुरेखा चौरे व सौ कविता कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले .श्री अमोल टोने व मुख्याध्यापक श्री महेश्वर कांबळे यांनी सर्व नियोजन करून कार्यक्रम यशस्वीतेपणे संपन्न केला. तसेच पप्पू जानकर व अमोल थोरात, पोलीस पाटील विजयकुमार कोरे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री साईनाथ देवकर व श्री नामदेव रंदवे यांनी केले.