मोहरा..
क्रांतीसूर्य शिवबा जन्मला, दिवस सोनियाचा उजाडला,,
सारला रूपाने त्या अंधार, आभाळीचा सूर्य झुकवला.
होत्या माताभगिनी सुरक्षित, जपले सर्वधर्मा सन्मानाने,,
नाव कोरले महाराष्ट्राचे, जगी सोनेरी अक्षराने..
गडकोटांवरची ढेकळं, शूर रक्ताचा त्यासी गंध,,
परी भरकटली तारुण्यात, आजची तरुणाई अंध.
या अंधारी दुनियेत, नाही सुरक्षित पदूर,,
राजे … या परतूनी दया सुरक्षेची चादर..
गोठतात इथे निषेध, आवाज़ दबतात न्यायाचे,,
राजे घ्या प्रतिशोध, करुनी उच्चाटन अन्यायाचे.
मिळावे आशिष शिवभक्तांसी, पाऊले वळावी शक्तीस्थळी,,
धूळ राजांच्या चरणांची, असावी त्यांच्या भाळी..
- सौ.शगुफ्ता शेख (हुंडेकरी पोथरे ता.करमाळा.)