जनतेशी रक्ताचे नाते जपणारे नेतृत्व; पांडे जि.प. गटात राणी वारे यांना जनतेचा भक्कम पाठिंबा : संतोष वारे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२) : पांडे जिल्हा परिषद गटातील जनतेशी आमचे नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते रक्ताच्या नात्यासारखे घट्ट आहे. आम्ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, तर समाजकारण हाच आमच्या जीवनाचा खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष वारे यांनी केले.

येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व खा. पवार यांच्या विचारधारेला पुढे नेत राणी संतोष वारे या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, जनतेचा त्यांना भरभरून पाठिंबा मिळत आहे, असा विश्वासही संतोष वारे यांनी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थकांची मोठी भूमिका राहिली आहे. हीच ताकद आणि विश्वास आता जिल्हा परिषद निवडणुकीत राणी वारे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. पक्षाचे संघटन आणि जनतेचा विश्वास हाच आमचा खरा शिरपेच आहे. भागात पूरपरिस्थिती उद्भवली असताना आम्ही राजकारण बाजूला ठेवून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अन्नधान्य, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पीडित कुटुंबांना आधार देण्याचे काम केले.
कठीण काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. राणी संतोष वारे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना आपल्या कामाची ठोस पावती दिली आहे. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, महिला सक्षमीकरणासाठी राबवलेले विविध उपक्रम यामधून त्यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य दिले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थकांची मोठी भूमिका राहिली आहे. हीच ताकद आणि विश्वास आता जिल्हा परिषद निवडणुकीत राणी वारे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. पक्षाचे संघटन आणि जनतेचा विश्वास हाच आमचा खरा शिरपेच आहे. भागात पूरपरिस्थिती उद्भवली असताना आम्ही राजकारण बाजूला ठेवून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अन्नधान्य, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पीडित कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. कठीण काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. राणी संतोष वारे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना आपल्या कामाची ठोस पावती दिली आहे. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, महिला सक्षमीकरणासाठी राबवलेले विविध उपक्रम यामधून त्यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य दिले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


