मकाई ऊस बिलासाठी फोन आंदोलन-पदाधिकारी, अधिकाऱ्यांना फोन सुरू - Saptahik Sandesh

मकाई ऊस बिलासाठी फोन आंदोलन-पदाधिकारी, अधिकाऱ्यांना फोन सुरू

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.23: मकाई कारखान्याची मागील हंगामातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बीलाची रक्कम  लवकरात लवकर जमा होण्यासाठी आंदोलकांनी फोन आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनाचाच एक भाग म्हणून  आजपासून ते 25 जानेवारी पर्यंत ऊस उत्पादक  शेतकऱ्यांनी  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री, सहकार मंत्री , साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक या सर्वांना फोन करण्याचे आंदोलन सुरू केले आहे.

ऊस बिल न मिळालेले प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून सगळ्यांना फोन करून व्यथा मांडावी तसेच थकीत ऊस बीलाची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचे मित्र, नातेवाईक, गावकरी यांनी सुद्धा  स्वतःहून फोन करून शेतकऱ्यांची व्यथा मांडावी… आणि ऊस बील त्वरीत मिळावे किंवा संचालक मंडळावर कारवाई करावी.
अन्यथा 26 जानेवारी रोजी जवळपास 250 शेतकरी सामूहिक आत्मदहन करणार ,असे आवाहन आंदोलक अॅड. राहुल  सावंत यांनी  केले. त्याला प्रतिसाद देत आज अनेकांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना फोन सुरू केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!