पैशापेक्षा शरिर संपत्ती महत्वाची - ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख - Saptahik Sandesh

पैशापेक्षा शरिर संपत्ती महत्वाची – ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख

कंदर प्रतिनिधी /संदीप कांबळे..

कंदर : आजच्या या धकाधुकीच्या युगात तरुण पिढी व्यसनाने बरबटलेली असून, त्यांचे जीवन धोक्यात आले आहे, त्यांच्याकडे कितीही श्रीमंती असून उपयोग नाही तर महत्त्वाचे म्हणजे शरीर संपत्ती महत्त्वाची आहे असे मत महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी व्यक्त केले.

कंदर (ता.करमाळा) येथील सरपंच प्रतिनिधी भास्करराव भांगे यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते, याप्रसंगी पुढे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, त्यामुळे व्यसनाच्या आहारी न जाता शुद्ध आहार घ्यावा. आणि अनमोल जीवनाचा उपयोग करावा असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी सरपंच भास्करराव भांगे यांचा विविध मान्यवर व मित्रमंडळी कडून सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आमदार संजय मामा शिंदे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह राज्यातील विविध भागातून शेकडो जणांनी दूरध्वनीवरून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ह.भ.प.शालिनीताई देशमुख महाराज ईंदुरीकर कंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव भांगे विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ भांगे नागनाथ खटके तानाजी बापू झोळ सुनील सावंत संतोष गायकवाड संजय गुटाळ ह.भ.प .भागवत महाराज चवरे पंढरपूर ॲड. जालिंदर बसळे आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्करराव भांगे मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमास कंदर सह परिसरातील विविध गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!