मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण -

मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण

0

केम (संजय जाधव) – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या १५ जून रोजी झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील विविध शाळा, ग्रामपंचायत, विविध रस्त्याच्या कडेला फळ झाडांची लागवड करण्यात आली आहे. यात आंबा, नारळ या सारख्या ६०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान करून चिवटे यांना आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामविकास अधिकारी हनुमंत देशमुख, गणेश चव्हाण, श्रीकांत सानप, धुळदेव शेंबडे, तुषार निमगिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!