करमाळा येथे आज काव्य मैफिलीचे आयोजन

करमाळा (दि.१६ ) – करमाळा तालुका साहित्य मंडळ, देवराई ग्रुप व श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने आज (दि.१६) करमाळा येथील खंडोबाचा माळ येथे काव्य मैफिल चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी नारायण सोरटे हे असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती विलासराव घुमरे, कवी प्रा. सुरेश शिंदे, ऍड. बाबुराव हिरडे, कवी प्रकाश लावंड, नारायण जगताप गणेश चिवटे,प्रा.नागेश माने, बाळासाहेब गोरे सुनीता दोशी, सिद्धेश्वर सोरटे, सचिन शिंदे, प्रा. नीलिमा पुंडे, बाळासाहेब भोसले, माधुरी साखरे डॉ.जाधव, दत्तात्रय रेगुडे अविनाश थोरात, महादेव भोसले, केदार मोकाशी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या काव्यमैफिलीचा आनंद घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केलेली आहे.






