‘कविता’ ही केली जात नाही ती कवीच्या ह्रदयातून जन्माला येते : डॉ.सुरेश शिंदे
करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१७ : कविता ही केली जात नाही ती कवीच्या हृदयातून जन्माला येते, असे मत ज्येष्ट कवी प्रचार्य डॉ. सुरेश शिंद यांनी व्यक्त केले. येथील कवी दादासाहेब पिसे यांच्या प्रवासात या कविता संग्रहाच्या प्रकाशनसमारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रकाशनसमारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ट कवी प्रकाश लावंड हे होते तर दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून कवी नारायण पुरी हे होते. व्यासपीठावर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष मिलींद फंड, तालुका साहित्य मंडळा उपाध्यक्ष प्राचार्य नागेश माने, डॉ.ॲड.बाबूराव हिरडे, तसेच शितलताई करे-पाटील, डॉ.कविता कांबळे होते.
पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, की ज्या प्रकारे एखाद्या झाडाचे फळ त्या देठाला कधी सोडून जाते, हे त्या झाडाला कळत नाही, इतक्या सहजतेने कवीता तयार होते. कवीतेसाठी कवीला वय लागत नाही अथवा वेळ लागत नाही. कवीता सुचलीकी ती कागदावर येते. सहज पणे ज्या कविता होतात, त्याच जनमानसाच्या हृदयाचा ठाव घेतात, त्याच पठडीतील कवीता दादासाहेब पिसे यांच्या आहेत. यावेळी कवी नारायण पुरी यांनी भाषणाची सुरवात वेगवेगळ्या विनोदाने केली तर विविध कविता सादर करत श्रोत्यांची मने जिंकली. यावेळी कवितेविषयी आपल्या भावना कवी दादासाहब पिसे यांनी मांडल्या. प्रास्ताविक कवयत्रि प्राची सरवदे यांनी केले, तर सुत्रसंचलन कु. गौरी दादासाहेब पिसे व कवी खलील शेख यांनी केले तर आभार कवी दिपक लांडगे यांनी मानले.
यावेळी गायक प्रविण अवचर, संदिप पाटील, उध्दव साळुंखे, ग्लोबल इन्स्टिट्यूट चे प्रा. महेश निकत, प्रा. अश्विनी निकत, बाळासाहेब गोरे, कमलाई ॲबॅकसच्या मंजुश्री मुसळे, जिनिअस ॲबॅकसच्या अंकीता वेदपाठक, अंध श्रध्दा निर्मुलनचे कार्याध्यक्ष अनिल माने, मार्गदर्शक दिगंबर साळुंके होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी खलील शेख, संतोष कांबळे, शिक्षक रमेश नामदे, सागार गायकवाड, विशाल परदेशी यांनी केले.