दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरूध्द पोलीस कारवाई.. - Saptahik Sandesh

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरूध्द पोलीस कारवाई..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : दारू पिऊन चारचाकी वाहन चालविणाऱ्या युवकाविरूध्द काल (ता. ७) करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नागनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी व माझे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल भराटे व श्री. जगताप असे आम्ही तिघेजण ७ जानेवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बायपास रोड, जयहिंद हॉटेल जवळ, करमाळा येथे दारू पिवून वाहन चालवणारे चालकांवर कारवाई करण्यासाठी थांबलो असताना, त्यावेळी रविंद्र युवराज शेळके ( वय – २४, रा.खडकेवाडी, ता.करमाळा) हा आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन बोलेरो पिकअप क्र. एमएच ४५ एएफ ५५७६ हा दारू पिवून वेडावाकडा चालवताना दिसून आला.

त्यावेळी आम्ही पिकअप थांबवून चालक रविंद शेळके याची ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता, तो दारू पिल्याचे आढळून आला. या प्रकरणी पोलीसांनी रविंद्र शेळके याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच श्रीदेवीचामाळ रस्त्यावरून दारू पिऊन दुचाकी वाहन चालविणाऱ्या अमोल सुग्रीव जोगदंड ( वय – ३६, रा. हिंगणगाव खुर्द, ता. परांडा) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!