घोटी येथे जुगारीवर पोलिसांचा छापा – ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

करमाळा(दि. २५): येथील पोलीस पथकाने २२ जुलै २०२५ रोजी घोटी येथील मारुती मंदिरासमोर पिंपळाच्या झाडाखाली सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात पोलीस कॉन्स्टेबल योगेश विठ्ठल येवले यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, घोटी गावात काही इसम पत्त्यांवर “मन्ना” नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ दोन पंच साक्षीदारांना घेऊन पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला तेथे 1. दत्तात्रय नारायण शिंदे 2. अनिल किसन थोरात,3. शिवाजी लक्ष्मण खरात ,4. गोपाळ बाबुराव डुकळे ,5. हनुमंत नारायण शिंदे 6. कुंडलिक दत्तात्रय थोरात 7. अभिमान रामा आरडे सर्व रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर हे जुगार खेळताना आढळून आले.त्यांच्याकडून ५२ पत्यांचा एक डाव
रोख रक्कम ₹४७०/एक चालू स्थितीतील निळ्या शाईचा बॉलपेन
सदर प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.



