करमाळा शहराजवळील कमलाभवानी शुगर कारखान्याचे प्रदूषण तातडीने थांबवावे : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मागणी.. -

करमाळा शहराजवळील कमलाभवानी शुगर कारखान्याचे प्रदूषण तातडीने थांबवावे : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मागणी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरालगत असलेल्या श्री विठ्ठल शुगर रिफाइंड फॅक्टरीचे कमलाभवानी शुगर साखर कारखान्याच्या प्रदुषणामुळे नागरीकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तरी तातडीने प्रदूषण थांबवावे अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,करमाळा शहरालगत श्री .विठ्ठल रिफाइंड शुगर प्रा .लि .पांडे हा साखर कारखाना असून सदर साखर कारखान्याने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केलेली नसल्याने या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर राख व काजळी बाहेर पडून आसपासच्या परिसरात सर्वत्र पसरत आहे . सदर कारखाना शहरालगत व श्री कमलादेवी मंदीर परीसरा जवळ आहे, या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे . या फॅक्टरीतून तयार होणाऱ्या राखेचे लोट संपूर्ण शहरात व घराघरांत पडत असून यामुळे नागरीकांना श्वसनाचे आजार बळावले असून सर्वसामान्य जनतेच्या स्वच्छतेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तरी या बाबींची गंभीर दखल घेवून तातडीने या शुगर फॅक्टरीने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे काय? असल्यास ती कार्यान्वित आहे का? नसल्यास त्वरीत प्रदूषण बंद करणेबाबतच्या उपाययोजना करणेबाबतच्या आपले स्तरावरून सूचना देवून कार्यवाही करणेत यावी. त्याचबरोबर सदर कारखान्यातून मळी मिश्रीत पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे आसपास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून परिसरातील पाण्याच्या स्तोत्राचा दर्जा खालावला असून शेतजमिनींचा पोत खराब होत आहे .या बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रदूषण बंद करणेबाबत कार्यवाही साठी तातडीने आदेश व्हावेत . या निवेदनाच्या प्रती कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उप – प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिल्या आहेत.

Although citizens are facing health problems due to the pollution of Shri Vitthal Sugar Refined Factory near Karmala, former MLA Jaywantrao Jagtap has written to the Maharashtra Pollution Control Board to demand an immediate stop to the pollution.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!