देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पोपट बोराडे यांची निवड

0

करमाळा (दि.२२) – देवळालीचे सरपंच सौ शिंदे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवड प्रक्रिया मंगळवारी गुप्त मतदान पद्धतीने पार पडली.

देवळाली ग्रामपंचायतीवर माजी आमदार संजयमामा शिंदे गटाची सत्ता आहे. सौ.अश्विनी धनंजय शिंदे या  18/02/2024 ते 18/04/2025 या दरम्यान १४ महिने सरपंच म्हणून कार्यरत होत्या. ठरलेल्या कालावधीनुसार विद्यमान सरपंच सौ. शिंदे यांनी राजीनामा दिला होता.  झालेल्या निवडणुकीत पोपट बोराडे यांचा ७ विरुद्ध ४ मतांनी विजय झाला असून त्यांनी सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पोपट बोराडे हे देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे समर्थक मानले जातात.

देवळाली ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या १३ असून यापैकी ११ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यामध्ये ७ मते मिळवत पोपट बोराडे यांनी सरपंचपद पटकावले.

नूतन सरपंच पोपट विष्णु बोराडे यांचा 21/04/2025 ते 11/02/2026  दरम्यान सरपंच पदाचा कालावधी राहणार आहे.  या निवडीनंतर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून नूतन सरपंच पोपट बोराडे यांचा सत्कार करण्यात आला.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!