करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्रासाठी संशोधन परिषद अभ्यासगट समितीचा सकारात्मक प्रतिसाद..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेलगाव (ता.करमाळा) येथे केळी संशोधन केंद्र व्हावे, यासाठी कृषीरत्न आनंद कोठडीया यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या शासनाच्या अभ्यासगट समितीचे अध्यक्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजाराम देशमुख व या समीतीचे सदस्य राज्याचे माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट साहेब यांच्या समावेत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांची बैठक झाली.
यामध्ये कृषीरत्न आनंद कोठडीया व उपस्थित प्रतिनाधींनी केळी संशोधन केंद्राची गरज कशासाठीआहे याचे उभयतांना सादरीकरण केले यावर मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात लवकरच कृषीमंत्री ,कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासमावेत बैठक लावून यासंबंधी प्रयत्न करण्याचे आश्वासित केले.
यावेळी शासनाच्या अभ्यासगट समीतीच्या अध्यक्षपदी व सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांचा तालुक्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी केळी निर्यातदार किरण डोके,लोक विकास फार्मर्स प्रोडयूसर कंपनीचे प्रतिनिधी गजेंद्र पोळ,विजय लबडे राजेरावरंभा फार्मर्स कंपनीचे अध्यक्ष डॉ विकास वीर, गणेश माने, सुनिल माने उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील केळी पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे जिल्ह्ययात या पिकासाठी पोषक वातावरण व शेतकऱ्यांना मोठ्या संधी आसल्याने या पिकाचे संशोधन केंद्र व्हावे अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे नवीन संशोधन केंद्र व्हावे अथवा असलेल्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे रूपांतर व्हावे यासाठी कृषीरत्न आनंद कोठडीया सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे येथे झाली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे कार्य काल सुसंगत व परिणामकारक होण्यासाठी या परिषदेच्या कार्याचे पुनरावलोकन करण्यासाठी अभ्यासगट गठीत करण्यात आला असून या समीतीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या अंतर्गत असलेल्या संशोधन केंद्राचा आढावा घेऊन त्यांचे बळकटीकरण करणे तसेच राज्यात नव्याने लागवडीसाठी व प्रास्तावित असलेल्या पिकावरील संशोधनासाठी उपाययोजना सुचवणे हे कार्य होणार असल्याने प्रतिनिधींनी समितीचे अध्यक्ष व सदस्यांची भेट घेऊन मागणी केली आहे.
यावेळी डॉ देशमुख यांनी केलेली मागणी योग्य असुन या संदर्भातील तांत्रिक बाबींची माहिती देऊन पुढील प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.तर माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम केळीची आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत यासाठी यासाठी संशोधन केंद्राची गरज आहेच या विषयाचे महत्त्व संबंधीतांना विषद करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले .तर कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी या विषयासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी करमाळा तालुक्यातील उपस्थित प्रतिनिधींनीना मार्गदर्शन केले.