पोथरे येथील पदाधिकाऱ्यांचा शिंदे व बागल गट सोडून भाजपमध्ये प्रवेश…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथे भारतीय जनता पार्टीची बुथ सशक्तिकरण आढावा बैठकीमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्व मान्य करत बागल गटाचे मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे यांनी आपल्या समर्थकांसह व शिंदे गटाचे नेते व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलराव शिंदे,पोथरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विष्णू रणदिवे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, अभिजीतदादा निंबाळकर, संघटन सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, लोकसभा प्रवास प्रभारी जयकुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना हरिभाऊ झिंजाडे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे, तसेच तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व गणेश चिवटे यांच्या कामाला प्रभावित होऊन मी माझ्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे, भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजना गणेश चिवटे यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, भगवानगिरी गोसावी, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, भाजपचे सरपंच डॉ.अभिजीत मुरूमकर, प्रवीण बिनवडे, उपसरपंच अमोल पवार, मच्छिंद्र हाके, दादासाहेब देवकर, नितीन निकम, बिभीषण गव्हाणे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक धर्मराज नाळे, नितीन झिंजाडे, सोमनाथ घाडगे, किरण शिंदे, मोहन शिंदे, बाळासाहेब होसिंग, संदिपान कानगुडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष राजश्री खाडे, शहर अध्यक्षा संगीता नष्टे, नानासाहेब अनारसे, विनोद महानवर, भैय्याराज गोसावी, अशोक साळुंखे, आजिनाथ सुरवसे, दीपक गायकवाड ,संदीप काळे, जयसिंग भोगे, विशाल घाडगे ,दादा गाडे, शिवाजी नाळे, हनुमंत रणदिवे, बापु मोहोळकर, आबा चौघुले, अण्णा पडवळे , ईश्वर मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.