पोस्टमास्तर मोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ (ता.करमाळा) येथील पोस्टमास्तर बबन मारूती मोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त जेऊर पोस्ट ऑफिसच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मोरे यांनी शेटफळ येथे पोस्टमास्तर म्हणून उत्कृष्ट सेवा केली ३१ मे रोजी पोस्ट खात्यातील सेवेतून निवृत्त झाले.शासकीय सेवेत असुनही काही व्यक्ती आपली नोकरी ही केवळ पगार मिळतो म्हणून नाही तर एक सामाजिक बांधिलकी व जबाबदारीचे भान ठेवून आपली सेवा बजावत असतात, अशातील एक व्यक्तीमत्व म्हणजे बबन मोरे हे होय..

प्रामाणिकपणा व सेवेतील तत्परता यामुळे त्यांनी गावातील लोकांचा विश्वास संपादन करुन सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले, शेटफळ गावातील लोकांना बचतीचे महत्त्व पटवून देऊन अनेकांना बचत करण्यस प्रवृत्त केले, अनेक छोटे शेतकरी शेतमजूर व दररोज मोलमजुरी करून गुजरात करणाऱ्या गावातील अनेक महिलांची पोस्टात खाती उघडून त्यांना बचतीची सवय लावली अडचणीच्या वेळेला त्यांना हक्काची बचत उपलब्ध करून दिली .यामुळे गावातील गोरगरीब कष्टकरी लोकांचे विश्वासाचे आणि हक्काचं ठिकाण म्हणजे बबन मामाचे पोस्ट ऑफिस बनले . सर्वांशी मिळून मिसळून राहणे हास्यविनोद करत आपली सेवा बजावणे ही त्यांची खासियत होती.संपुर्ण गावाची खडानखडा माहीती असणारं हे व्यक्तिमत्त्व आपल्या शासकीय जबाबदारीतून मुक्त होत आहे त्यांच्या यशस्वी लोकाभिमुख सेवेबद्दल जेऊर पोस्ट ऑफिस व शैटफळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!